कांदापिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

धुळ्यात हवामान बदलाचा फटका कांदा पिकाला बसतांना दिसून येत आहे. कांदा पिकावर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कांदा पिकाचे नसून होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकरी संकटात सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता रब्बी हंगामावर देखील परिणाम होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्याचे याचा परिणाम शेती पिकावर होत असून, कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.

सकाळी धुके दुपारी उन्हाचा चटका
वातावरणात आता बदल जाणवून येत आहे. थंडी पडत असल्याने त्याचा गहूसाठी फायदा होणार आहे. मात्र सकाळी पडणारे धुके आणि त्यानंतर दुपारी जाणवणारा उन्हाचा कडाका यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणातील हा बदल पिकांसाठी हानिकारक ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.