NIA ने मोठी कारवाई करत तब्बल ४१ ठिकाणी मारले छापे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

NIA ने मोठी कारवाई करत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तब्बल ४१ ठिकाणी छापे मारले आहे. पुणे, मुंबई, ठाणे ग्रामीण यासह अनेक भागात छापे मारत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जवळपास १५ जणांना अटक केली. या धाडसत्रादरम्यान एनआयए अधिकाऱ्यांनी भिवंडीच्या पडघ्याजवळील बोरिवली गावातील २० ते ३० जणांना समन्स बजावले होते. आज चौकशीसाठी येण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्याप्रमाणे आज सोमवारी म्हणजे आज चौकशीसाठी येण्याचे हे समन्स होते. त्याप्रमाणे आज NIAच्या मुबई येथील कार्यालयात हे सर्वजण आले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

एकाचवेळी अनेक ठिकाणी छापेमारी

एनआयए, एटीएस अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी मिळून शनिवारी पहाटेपासूनच हे धाडसत्र सुरु केले. ISIS यांच्या दहशतवादी संघटनेच्या विरोधात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. राष्ट्रीय तपासा संस्थेला अतिरेक्यांच्या चौकशीमधून माहिती मिळाली. त्यानंतर ISIS चे देशभरातील नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी करण्यात आली. महाराष्ट्रासह कर्नाटकमध्येही अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. ठाणे ग्रामीणमध्ये भिवंडीतील पडघा येथे कारवाई करण्यात आली.

त्याच गावातील २०-३० जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान या धाडसत्रात शस्रास्रे आणि मोठी रोख रक्कमही जप्त करण्यात आली. एवढेच नव्हे तर यावेळी दहशतवादी संघटना हमासचे झेंडे देखील मिळाल्याचा दावा एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.