शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीत अशांती !

निवडणुकीत माघार नाहीच : केंद्रीय मंत्र्यांकडून मनधरणीही फोल

0

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क 

नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी नंतर आता महाविकास आघाडी आणि महायुती तसेच अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून निवडणूक लढण्यासाठी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी सुरुवातीपासून अथक प्रयत्न केले. उमेदवारी न मिळाल्यामुळे स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली तर, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत महायुतीत नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि अखेर विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनाच तिसऱ्यांदा महायुती शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला.

उमेदवारी माघारी घेण्यासाठी स्वामी शांतिगिरी महाराज यांना थेट दिल्लीपासून मनधरणीसाठी फोन आले. नाशिकमधील आजी-माजी पालक मंत्र्यांनी देखील स्वामी शांतिगिरी महाराजांची उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय ठाम ठेवला आणि त्यामुळेच आता नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीला शांतिगिरी महाराजांनी घाम फोडल्याचे बोलले जात आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतिगिरी महाराज यांचा जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहेत. शांतिगिरी महाराजांच्या अपक्ष उमेदवारीमुळे हिंदू मतांची विभागणी होऊन थेट महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. स्वामी शांतिगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना मात्र मोठा फटका बसू शकतो. शांतिगिरी महाराजांची उमेदवारी कायम ठेवण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने देखील लढण्याची भूमिका घेतली. महाविकास आघाडी कडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यामुळे महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळेल यावर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मात्र शेवटच्या टप्प्यात विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना महायुतीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

मनधरणी ठरली फोल
शांतिगिरी महाराजांची उमेदवारी महायुतीच्या उमेदवारालाच घातक ठरवू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. हिंदू मतांची विभागणी, शहरी भागातील मतदान, नाशिक लोकसभा मतदारसंघातील जय बाबाजी भक्त परिवाराचा मतदानाचा टक्का बघता हे सर्व मतदार महायुतीचे पारडे फिरवण्याचे प्रयत्न करतील आणि गोडसेंना त्याचा थेट फटका बसू शकतो. त्यामुळे महायुतीकडून गोडसेंच्या विजयासाठी शांतिगिरी महाराजांची माघार घेणे महत्त्वाचे होते. मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, छगन भुजबळ, त्यासोबतच केंद्रातील देखील मंत्र्यांनी शांतिगिरी महाराजांची मनधरणी केल्याचे आहे. त्यामुळे महायुतीच्या हेमंत गोडसेंना फटका बसू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.