…अन्यथा कारवाईस तयार राहा ! 

भाजप नेतृत्त्वाकडून नेते, पदाधिकाऱ्यांना इशारा : शहा ऍक्टिव्ह

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची चिंता वाढली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपने आता ताकद पणाला लावली आहे. यासाठी केंद्रीय पातळीवरुन हालचाली सुरु झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यापासून मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपने नेत्यांना सूचना केल्या आहेत. कमी मतदान झाल्यास नेत्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. मग त्यांनी कारवाईसाठी तयार राहावे, असा थेट इशारा भाजप नेतृत्त्वाकडून देण्यात आला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने भाजपची धाकधूक वाढली आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात अधिक मतदान झाले. पण भाजपच्या अंदाजानुसार तेही कमी आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत: सक्रिय झाले आहेत. राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून त्यांनी सूचना दिल्या आहेत. देशात आज तिसऱ्या टप्प्यातले मतदान होते. त्यापूर्वी शहा यांनी लोकसभा प्रभारी, प्रदेश प्रभारी आणि संघटनांच्या नेत्यांना सर्व जागांवर मतदान वाढवण्याबद्दल सूचना दिल्या. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सर्व राष्ट्रीय सरचिटणीस देखील मतदानावर लक्ष ठेवून आहेत.

‘त्यांचे’ मतदान 100 टक्के झाले पाहिजे

वाढत्या आणि कडक उन्हामुळे मतदान कमी होते. पण प्रत्येक मतदान केंद्रावर पूर्वीपेक्षा 370 मते कशी पडतील, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. केंद्रीय योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचे 100 टक्के मतदान व्हायला हवे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मोफत रेशन योजना असो वा प्रधानमंत्री आवास योजना, लाभार्थ्यांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी भाजपची टीम कामाला लागली आहे.

बैठकांचा जोर, बावनकुळे सक्रिय

मतदानाचा टक्का कोणत्याही परिस्थितीत वाढवा, असे निर्देश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तब्बल 11 बैठक घेतल्या. एका मतदारसंघातील 1 हजार बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि सुपर वॉरियर ऑनलाईन बैठकांनी उपस्थित होते. महाविजय 2024 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेच पाहिजे. त्यात कोणतीही कसर सोडू नका, अशा सूचना वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.