एसबीआयच्या एटीएममधून तीन बॅटऱ्या चोरल्या ; गुन्हा दाखल

0

जळगाव ;- तालुक्यातील जळके येथील बसस्थानक परिसरात बस स्टॅन्डजवळ असणाऱ्या एसबीआय बँकेच्या एटीम मध्ये अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून २४ हजार रुपये किमतीच्या ३ बॅटर्या चोरून नेल्याचा प्रकार १० रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील जळके येथील बसस्थानक परिसरात असणाऱ्या एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये १० रोजी अज्ञात चोरटयांनी काळ्या रंगाचा स्प्रे मारून वायरी तोडून बॅटर्या चोरी केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर दीपक दौलत तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ स्वप्नील पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.