अवकाळी पावसाचा फटका,केळी पिक जमीनदोस्त

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

३० नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास मनवेल , थोरगव्हाण, पथराडे, शिरागड शिवारात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने केळी पिक जमीनदोस्त झाले आहे.

यावल तहसिलदार मोहनमाला नाझीकर, साकळी मंडळधिकारी सचिन जगताप, तलाठी विजय वानखेडे, कृषि साह्यक मार्कडेय मिटके, कोतवाल विजय भालेराव यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पंचनामे करीत आहे.

३० नोव्हेंबरच्या रात्री वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडात मुसळधार पाऊस रात्रभर सुरु होता. यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पंचनामे सुरु असून आकडेवारी अद्यापही समजली नाही. माजी.प.स.सदस्य अरुण पाटील, गोविंद पाटील थोरगव्हाण येथील लहु बंडु सोनवणे यांच्या शेतातील केळी पुर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. मनवेल, थोरगव्हाण परीसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.