इलॉन मस्कला कर्मचाऱ्यांनी दिला मोठा धक्का, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून एक्स, म्हणजेच ट्विटरसमोर बऱ्याच मोठ्या अडचणी समोर येत आहे. कित्येक जाहिरातदार हा प्लॅटफॉर्म सोडून जात असतांनाच आता कर्मचारी देखील कंपनीला रामराम ठोकत आहे. एक्सच्या टीममधील कित्येक कर्मचाऱ्यांनी एकत्र राजीनामा दिला असल्याचं समोर येत आहे.

क्लेअर अ‍ॅटकिन्सनने याबाब्तर एक रिपोर्ट समोर आणला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सेल्स टीममधील कित्येक वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यातील कित्येक कर्मचाऱ्यांना बोनसच चेक देखील मिळाला होता. मात्र, तरीदेखील त्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एक्सच्या इतर विभागातील कर्मचारी देखील कंपनीला रामराम ठोकत आहे.

काय आहे कारण?
एक्स या प्लॅटफॉर्मला भविष्य नसल्याचं मत कित्येक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. यामुळेच तगडा बोनस मिळूनही कर्मचारी कंपनी सोडत आहेत. यामुळे एक्समध्ये आता अगदी मोजके कर्मचारी शिल्लक राहिले आहेत. गेल्या वर्षी आधीच मस्कने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. यानंतर आता कित्येक कर्मचारी एकत्रित राजीनामे देत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.