काय सांगता…. रिलीज होताच लीक झाला रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या मनोरंजन विश्वात दोन चित्रपटांची चर्चा रंगली आहे. त्यात एक म्हणजे ‘अ‍ॅनिमल’ आणि दुसरा म्हणजे ‘सॅम बहादूर’, एक रणबीर कपूरचा आणि दुसरा विकी कौशलचा. त्यातच रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा या वर्षात मोस्ट अवेटेड सिनेमा आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून खूप जास्तच चर्चा रंगली आहे. आता सिनेमा प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. पहिल्या दिवशी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली होती.

एकीकडे या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामे करेल अशी चर्चा होती मात्र, आता निर्मात्यांसाठी एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर लगेचच ऑनलाईन झिका झाल्याची माहिती समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, MovieRules, FilmyZilla, TamilRockers, Telegram आणि 123Movies या सारख्या अनेक साइट्सवर Animal हा चित्रपट उपलब्ध आहे. लोक या साईट वरुन चित्रपट HD प्रिंटमध्ये डाउनलोड करत आहेत. त्यामुळे आता या सिनेमाचे महागडे तिकीट खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या हा चित्रपट प्रेक्षक पाहू शकणार आहे. त्यामुळे याचा परिणाम तिकीट खरेदीवर होईल अशी चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.