‘क्रिश’च्या भूमिकेत पुन्हा दिसणार हृतिक रोशन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क –
सुपरहिरो ‘क्रिश’ पुन्हा पडद्यावर परतणार आहे. या फ्रँचायझीचा ‘क्रिश 3’ 2013 साली रिलीज झाला होता. गेल्या 11 वर्षांपासून ‘क्रिश 4’ बद्दल सातत्याने चर्चा होत आहे. चाहतेही त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ‘वॉर’, ‘पठाण’ आणि ‘फाइटर’ यांसारखे चित्रपट बनवणाऱ्या सिद्धार्थ आनंदने हृतिक रोशन पुन्हा एकदा पडद्यावर सुपरहिरोच्या भूमिकेत खळबळ उडवून देणार असल्याची पुष्टी केली आहे.

सिद्धार्थ आनंदने या अनिश्चिततेला पूर्णविराम दिला आहे. ‘क्रिश 4’ वर काम सुरू असल्याचं त्यांनी दुजोरा दिला आहे. हृतिक रोशनसोबत ‘फाइटर’, ‘वॉर’ आणि ‘बँग बँग’मध्ये काम केलेल्या दिग्दर्शकाने एका पोस्टला उत्तर दिले. यामध्ये एका चाहत्याने विचारले होते की, ‘क्रिश’ पुन्हा येतोय का? सिद्धार्थने उत्तर दिले, ‘हो! तो येत आहे.असं म्हणत खुलासा केला होता. ‘क्रिश 4’चे शूटिंग 2025 मध्ये सुरू होणार आहे.चर्चा सुरु आहे. ‘वॉर 2’ च्या शूटिंगसोबतच हृतिक रोशनने ‘क्रिश 4’ची तयारीही सुरू केली आहे. क्रिश 4’ चे प्री-प्रॉडक्शनचे काम 2024 शेवट पर्यंत पूर्ण होईल, तर त्याचे शूटिंग 2025 मध्ये सुरू होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.