रक्षाताई खडसे यांच्या माहेरची मंडळीही प्रचारात सहभागी

0

मुक्ताईनगर :– रावेर लोकसभा निवडणुकीतील भाजपा-महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ त्यांची कन्या क्रिशिका व मुलगा गुरुनाथ व संपूर्ण माहेरची मंडळी प्रचारासाठी मैदानात उतरली आहेत. प्रथमच आईच्या प्रचारासाठी मुंबई येथे शिक्षण घेणारा मुलगा गुरुनाथ व नुकतीच 10 वी परीक्षा दिलेली व वैद्यकीय शिक्षणासाठी तयारी करत असलेली मुलगी क्रिशिका गावोगावी प्रचारात सहभागी होऊन आईसाठी मत मागत आहे.

खासदार रक्षाताई खडसे यांचे संपूर्ण खेड, ता.शहादा येथील माहेर म्हणजे आई-वडील, मोठे भाऊ, वहिनी, भाची व चुलत भाऊ प्रचारासाठी मुक्ताईनगर येथे मोठ्या उत्साहात दाखल झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकनाथराव खडसे हे प्रत्यक्ष प्रचारात सहभागी नसले तरी ते रात्रीपर्यंत हितचिंतकांच्या भेटी घेत आहेत. खासदार रक्षाताई खडसे यांच्यासाठी सासर व माहेर संपूर्ण ताकदीनिशी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे दिसत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.