नशेखोरांचा पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला; विषारी इंजेक्शनमुळे मृत्यू…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

मुंबई पोलिसांच्या लोकल आर्मसमधील एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संशयास्पद मृत्यू यामागचे कारण आहे. माटुंगा स्थानकाजवळ नशेखोरांनी या पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला केला होता. या पोलीस कॉन्स्टेबलला चोरट्यांनी विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना बुधवारी समोर आली आहे. विशाल पवार असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार नेहमीप्रमाणे रविवारी रात्री कामावर जात होते. त्यावेळी ते लोकलमधून प्रवास करत होते. सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान ते लोकलच्या दरवाज्यात उभे राहून फोनवर बोलत होते. त्यावेळी एका व्यक्तीने विशाल पवार यांच्या हातावर फटका मारला. तो त्यांचा मोबाईल घेऊन पळाला. दरम्यान मोबाईल चोराला पकडण्यासाठी विशाल पवार यांनी स्लोव असल्याने ट्रेनमधून उडी मारली. त्यांनी मोबाईल चोराचा पाठलाग सुरू केला होता. मात्र, पुढे दबा धरून बसलेल्या चोरांनी आणि नशेखोरांनी विशाल पवार यांना घेरलं. या नशेखोरांनी पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांना पकडून त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन दिलं. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

तर, त्यांच्या तोंडातून लाल रंगाचं द्रव्य सुद्धा टाकले. यामुळे विशाल पवार बेशुद्ध पडले. त्यांना तब्बल १२ तासांनी शुद्ध आली. परंतु, घरी गेल्यावर मात्र विशाल पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने ठाण्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान विशाल पवार यांचा मृत्यू झाला आहे.

परंतु, मृत्यूपूर्वी कोपरी पोलिसांनी विशाल पवार यांचा जबाब घेतला होता. दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली होती. आता या प्रकरणाचा पुढील तपास दादर जीआरपीकडे वर्ग करण्यात आलं आहे. दादर जीआरपी करणार कलम ३०२ (हत्या) अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.