बापरे! ऑनलाइन ऑर्डर केलेले पार्सल उघडताच स्फोट; बाप आणि मुलीचा मृत्यू…

0

 

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

गुजरातमधील साबरकांठा येथे ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पार्सलचा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटात मृत्युमुखी पडलेले वडील आणि मुलगी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑनलाइन माध्यमातून आलेले पार्सल उघडतानाच फुटल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

स्फोटामुळे वडील आणि मुलीचा मृत्यू झाला

स्फोटात जखमी झालेल्यांना हिंमतनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या स्फोटात एका व्यक्तीच्या दोन मुली, एक 9 वर्षांची आणि दुसरी 10 वर्षांची, गंभीर जखमी झाल्या आहेत. तर जितेंद्र हिराभाई वंजारा नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. जितेंद्र यांची मुलगी भूमिका वंजारा हिचाही मृत्यू झाला.

होम थिएटर साउंड सिस्टिमसाठी ऑर्डर दिली

मिळालेल्या माहितीनुसार, साबरकांठा येथील वडाळी तालुक्यातील वेडा छावणी गावात जितेंद्रभाई हिराभाई वंजारा यांच्या नावाचे पार्सल आले. त्यांनी होम थिएटर साउंड सिस्टीम मागवली होती ती उघडताच स्फोट झाला. या स्फोटात ३० वर्षीय जितूभाई वंजारा आणि त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. शिल्पाबेन विपुलभाई वंजारा आणि छायाबेन जीतूभाई वंजारा या दोन मुलीही गंभीर भाजल्या असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलीसाचा तपास सुरु..

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी व जिल्हा एलसीबीसह वडाळी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला व पुढील तपास सुरू केला. पोलिस सध्या हे पार्सल कसे आले याचा तपास करत आहेत. तो कोणी दिला आणि कसा स्फोट झाला? जीतूभाईचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलीचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.