मुंबईत आज प्रचाराचा सुपर फ्रायडे !

0

नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांची शिवाजी पार्क तर इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर सभा

मुंबई ;- मुंबईत आज सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्ज ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीतर्फे शरद पवार , उद्धव ठाकरे , मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जाहीर सभा सायंकाळी ५ वाजता होत आहे . एनडीए आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार असल्याने त्यामुळे आजचा शुक्रवार सुपर फ्रायडे होणार आहे .

लोकसभा प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी सायंकाळी दादर येथील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. मोदी यांच्या महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा प्रचारासाठी आतापर्यंत १६ जाहीर सभा व मुंबईत एक रोड शो झाला आहे. राज्यात शुक्रवारी शिवाजी पार्कात होणारी ही मोदींची १७ वी व शेवटची सभा असणार आहे. मुंबईतील महायुतीच्या सहा उमेदवारांसाठीची एकत्रित नेत्यांची राज्यातील ही प्रचाराची सांगता सभाच असणार आहे. महाविकास आघाडीने सध्या महायुतीसमोर तगडे आव्हान निर्माण केल्याने मोदींनी २०१९ च्या तुलनेत यंदाच्या लोकसभेला राज्यात दुप्पट सभा घेतल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईतील मोदींची ही शेवटची सभा असेल. मुंबईतील महायुतीचे लोकसभेचे सर्व सहा उमेदवार यावेळी उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे .

टप्प्यात मुंबईतील सहा जागांसह एकूण १३ जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यातील मुंबईतील आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीच्या वतीने शुक्रवार, १७ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता संयुक्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच शनिवार, १८ मे रोजी इंडिया आघाडीची हॉटेल ग्रँड हयात येथे संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.