संशयाच्या कारणावरुन पोलिस उपनिरीक्षकाची एकास मारहाण

0

पोलिस उपनिरीक्षक यांचेविरूद्ध गुन्हा दाखल 

 

पाचोरा– येथील पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक यांनी संशयाच्या कारणावरून एका तरूणास मारहाण केल्या प्रकरणी जखमी तरूणाच्या फिर्यादिनुसार पाचोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

याबाबत पोलीस प्रशासनाकडुन  प्राप्त माहीती अशी की, २२ व २४ नोहेंबर रोजी अनूक्रमे राञी साडे अकरा व साडेदहाच्या सूमारास काॅलेज ग्राउंड व सिंधी काॅलनी परीसरात उल्हासनगर येथिल प्रथम संदिप गायकवाड या १९ वर्षीय तरूणावर संशयाच्या कारणावरून पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र वल्टे यांनी शिविगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाण प्रसंगी सोडवण्यासाठी व समजवण्यासाठी आलेले प्रथमचे मामा संदिप ब्राम्हणे सोडवण्यासाठी आले असता त्यांना ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी झालेल्या प्रथम याचेवर पाचोरा शहरातील सिध्दिविनायक हाॅस्पिटलमध्ये उपचार घेण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात प्रथम संदिप गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांचेविरूद्ध  गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरिक्षक राहुल खताळ हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.