खासगी बॅंकेने सिल केलेल्या मालमत्तेत अनाधिकृत प्रवेश एका विरुध्द गुन्हा दाखल

0

पाचोरा – खाजगी बॅंकेकडुन घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बॅंकेने सिल केलेल्या मालमत्तेत अनाधिकृत प्रवेश केल्याने एका विरुध्द पाचोरा पोलिसात ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, प्रदिप प्रतापसिंग गुजर रा. पुनगाव ता. पाचोरा यांचे साई अॅग्रो नावाने देवगिरी नागरी सहकारी बँक, शाखा पाचोरा येथे हायपोथिकेशन खाते क्रमांक – १२ व मुदत कर्ज खाते क्रमांक – १४ आहे. प्रदिप गुजर यांनी खाते क्रमांक – १२ वर दि. २५ जुन २०१५ रोजी २५ लाख रुपये व मुदत कर्ज खाते क्रमांक – १४ वर दि. १७ मार्च २०१६ रोजी १० लाख रुपये कर्ज हे व्यवसायासाठी घेतले होते. या कर्जापोटी प्रदिप गुजर यांनी पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील ग्रामपंचायत मिळकत क्रं. २७ मधील क्षेत्रफळ २६९ . ५१ चौरस मीटर जागा व बांधकाम तसेच पाचोरा शहरातील गणेश प्लाझा शाॅपिंग काॅम्प्लेक्स मधील शाॅप क्रं. एल. ४ मधील क्षेत्रफळ १४७ . ८४ चौरस मीटर ही मालमत्ता तारण दिलेली होती. मात्र दि. २५ मे २०१९ पासुन प्रदिप गुजर यांनी दोन्ही कर्जाचे व्याज व हप्ते भरलेले नसल्याने बॅंकेने त्यांना वेळोवेळी कर्ज भरण्या बाबत नोटीस देवुन ही कर्जाचे हप्ते भरले नाही. त्यामुळे बॅंकेने सदर मालमत्ता ही ताब्यात घेण्याबाबत जिल्हाधिकारी दंडप्र / ४ / सिक्यु / एस. आर. ४९२९१ / २०२२ यांचे आदेशानुसार सदर मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यावरुन तहसिलदार पाचोरा यांनी प्राधिकृत करण्यात आल्याने २२ नोव्हेंबर २०२३ रोजी मौजे पुनगाव येथील व गणेश प्लाझा येथील शाॅप तारण मिळकत देवगिरी नागरी सहकारी बँकेने ताब्यात घेत सिल करण्यात आली होती. तसेच सदर मालमत्तेच्या सुरक्षेसाठी बॅंकेने सुरक्षा रक्षक तुषार जठार रा‌. पुनगाव ता . पाचोरा यांची नेमणूक केली होती. दरम्यान २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी प्रदिप गुजर यांनी पुनगाव येथील व गणेश प्लाझा येथील शाॅप बॅंकेने सिल केलेले असतांना देखील अनधिकृतपणे सिल तोडुन मालमत्तेत प्रवेश केल्याने ३० नोव्हेंबर रोजी देवगिरी नागरी सहकारी बँक, शाखा पाचोरा येथील अधिकृत अधिकारी गंगाराम खंडु गवळी यांच्या फिर्यादीवरून प्रदिप गुजर यांचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काॅं. प्रकाश पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.