घामाचे दाम लाखात तरिही सालदार मिळेना

आखाजीला साल ठरण्याची परंपरा होतेय लोप

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
चिनावल ( प्रतिनिधी ) अक्षय तृतीया म्हणजेच आखाजीला शेतकरी आपल्या शेती वहिवाटी साठी वर्षं भराकरीता सालगडी ( सालदार ) ठरवतात ही पुरातन परंपरा काळानुरूप सुरू असली तरी आज मितीला सालदारा ला त्याचे घामाच्या दामाला लाखांपेक्षा जास्त मोल येवून ही साल धरण्यास मजूर तयार नसल्याने ही परंपरा लोप होण्याच्या मार्गावर आहे
खानदेश सह अनेक भागात शेतकरी वर्षभर ( सालभर ) आपल्या शेतात काम करण्यासाठी सालगडी ठरवतात आखजी ते आखजी अशी साला साठी एक विशिष्ट मोबदला या साठी या दिवशी शेतकरी ठरवून त्याला गोडधोड खावू घालून आपल्या घरी सालगडी म्हणून सामिल करून घेतात.
मात्र गेल्या काही वर्षांपासून सालगडी लागण्यास कोणी ही मजूर तयार होताना दिसत नाही विषेष म्हणजे सद्यस्थितीत या सालगडी ला त्याचे घामाचे दाम आजमितीला लाखांच्या घरात असून ही केवळ अंगावर ( उधळै ) तसेच रोजंदारी पद्धतीने काम केल्यास जास्त मजूरी मिळते या समजुतीने साल धरण्यास कोणी तयार होत नाही असा समज असला तरि काही लोक आजही साधन शेतकरी कडे साल धरून आहे
तर ही परंपरा लोप पावण्याची कारण म्हणजे आज ची बदललैली जीवनशैली, तसेच वाढलेली साक्षरता व बाहेर शहरात कंपनीत नौकरी करून जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणारी आजची पिढी , गावातून कमी होणारी मजूरांची संख्या ही असली तरी शेतकरी आपली शेती नेहमीच अस्मानी सुलतानी संकटाशी दोन हात करित सुरू ठेवतो शेती ही आजरोजी कमाई चे साधन नाही तर पारंपरिक व्यवसाय व स:तासहित इतरांच्या पोटापाण्यासाठी घट सोसून मांडला जाणारा डाव च म्हणावा लागेल यात ही मोठी मजूरी देवून ही न मिळणारे मजूर अशा स्थितीत ही साल भर सालगडी नेमणे ,त्याला ॉअडव्हान्स दिला जाणारी रक्कम यांची शाश्वती नसतानाही केवळ विश्वास वर सालगडी नैमण्याची प्रता बंद होण्याच्या मार्गावर आहे मात्र शेतकरी पर प्रातिय का असैना कामा साठी पर प्रातिय सालगड्याची नैमणूक आज करताना दिसत आहे एकंदरीत दिवसंन दिवस सालगडी पद्धत बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.