भडगाव तालुक्यात वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून

0

भडगाव: ;- ऊसनवार दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरुन व जादूटोणा केल्याच्या संशयावरून येथील ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील वरखेड येथील खदानीत घडली. याबाबत मयत वृद्धाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन एका २४ वर्षीय संशयिता तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने भडगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुपडु नाना वेलसे (वय ६५, रा. पेठ भाग, भडगाव) असे मयत वृद्धाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावाचे मधिल दगडाचे खदानीत दि. ८ मे रोजी सकाळी मिळून आला होता. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील व त्यांचे पथक पोउपनिरी गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव अश्यांना घेवून घटनास्थळी वरखेड ता. भडगाव जवळील खदान येथे जावून त्यांनी मयताची ओळख पटविली. याप्रकरणी एलसीबीने तपास सुरु केला होता. त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मयत सुपडु वेलसे हा संशयित आरोपी कुणाल उर्फ हितेश चुडामण मराठे (वय २१, रा. पेठ भाग भडगाव) याचे सोबत होता. त्यावरून वरील पथकाने कुणाल मराठे याचा पेठ भागात भडगाव येथे शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.

एलसीबीने त्यास ताब्यात घेवून गुन्ह्याचे पुढील तपासकामी भडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरचा तपास हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.