चोरट्यांनी १ लाख ३० हजारांचे दागिने चोरले

0

जळगाव : – गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या  घरात चोरट्यांनी डल्ला मारला. घरातील कपाटातून चोरट्यांनी १ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. ५ मे रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील रायपूर येथे नामदेव पंडीत पाटील हे वास्तव्यास असून ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते डयुटीला
गेल्यानंतर त्यांच्या घरी त्यांची पत्नी व त्यांच्या सासडूचा मुलगा होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास नामदेव पंडीत यांची पत्नी
आणि त्यांच्या साडूचा मुलगा हे गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी घराच्या बाहेर असलेल्या लोखंडी दरवाजाला कुलूप लावलेले होते. दरम्यान,
चोरट्यांनी त्यांच्या दरवाजे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटातून १ लाख ३० हजार सायांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरुन नेले.

सकाळी सात वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई या गच्चीवरुन खाली आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. तसेच घरातील लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला.याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.