येत्या चार दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता

0

पुणे ;- विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आजही अवकाळी पावसाची शक्यता असून पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. आयएमडीच्या अंदााजानुसार, विदर्भासह मराठवाड्यात 12 मेपर्यंत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूर, आणि हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.