ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवे तसे ते करतात – अजित पवार

0

पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांनी पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विधान केले असून यात त्यांनी “शरद पवार यांच्या मनात असते तोच निर्णय ते घेत असतात. ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवं तसं ते करतात.”, असं अजित पवार पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले.

मी शरद पवारासांबोत फार जवळून काम केलंय. त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. .शरद पवार अनेकदा संभ्रमावस्था निर्माण करणारी विधाने करतात. उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील असे वाटत नसून शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि तो सामुहिक निर्णय असल्याचं दाखवतात असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी पुढे म्हटले की, आम्ही निर्णय घेतला तेव्हा ते एकटेच विरोध करत होते. त्यांना हवा तोच निर्णय ते घेतात आणि फक्त दाखवतात की तो निर्णय सामुहिक आणि चर्चा करून घेतला आहे. शरद पवार कुणाचंही ऐकत नाहीत, ते मनाला वाटेल ते करतात आणि त्यांचा तो स्वभाव बदलणं शक्य नाही.

शरद पवारांवर थेट टीका करताना अजित पवार यांनी म्हटलं की, किमान भाजप बरोबर जाण्याची चर्चा झाल्याचं शरद पवार कीमान आता मान्य करत आहेत. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो.

Leave A Reply

Your email address will not be published.