अहो आश्चर्यच.. सर्वात लांब काकडी पाहिलीय..?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क

 

आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर लांबलचक काकडीचा फोटो व्हायरल होतोय. काकडीचे अनेक प्रकार तुम्ही पहिले असतील खाल्ले देखील असतील.. पण आज आम्ही तुम्हाला सर्वात लांब काकडी दाखवणार आहोत हे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्की बसेल.

4 फूट लांब काकडी 

एका माळीने सर्वात लांब काकडी पिकवली असून याचीच चर्चा सध्या होत आहे. एवढंच नाही तर या काकडीने सर्वात मोठी असण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही केलाय. डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार, व्यवसायाने माळी असलेला व्हिन्स 4 फूट लांब काकडी घेऊन वूस्टरशायरच्या माल्व्हर्न येथे आयोजित यूके नॅशनल जायंट व्हेजिटेबल्स चॅम्पियनशिपमध्ये पोहोचला. तेव्हा सर्वच  काकडीला पाहून आश्चर्यचकित झाले. जगातील सर्वात मोठी काकडी अशी तिला उपमा देण्यात आली. एवढी मोठी काकडी आजपर्यंत कोणी वाढवू शकले नाही. ही इतिहासातील सर्वात मोठी काकडी ठरली आहे. या काकडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश केला जाऊ शकतो. सध्या त्याची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.

काकडीचे वजन 13. 61 किलो

विन्स सांगतात की एवढी मोठी काकडी वाढवणे अजिबात सोपं नव्हतं पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. काकडीचे वजन पेलता यावे म्हणून त्याने काकडीच्या खाली एक मजबूत जाळी ठेवली होती. याशिवाय पाऊस आणि उन्हापासून संरक्षण करण्याचाही तो सतत प्रयत्न करत होता. या काकडीचे वजन 13. 61 किलो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.