नागपूरात पूरग्रस्त स्थितीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

नागपुरात आलेल्या पूरग्रस्त संकटामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अंबाझरी तलाव परिसरातून त्यांच्या पाहणीला सुरुवात झाली. दागा लेआऊटमध्ये देखील फडणवीसांनी नुकसानाचा आढावा घेतला. पूरग्रस्त इमारतींमध्ये पाहणी करतांना काही रहिवाशांनी प्रशासनबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. नाग नदी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानं नागपुरात पूरस्थिती निर्माण झाली. अंबाझरी तलावही ओव्हर फ्लो झाल्याने शहरांत पाणी शिरले आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू तर, १० हजरांहून अधिक घरं आणि दुकानाचं नुकसान झाल आहे.

पुरस्थितीमागच्या अनेक संभाव्य कारणांपैकी एक कारण समोर येत आहे. आणि ते म्हणजे शासकीय यंत्रणांच्या विविध विकासकामांमुळे नाद नदीच्या प्रवाहाला जागोजागी अडथळे निर्माण झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी नादीं आपला प्रवाह बदलल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सीताबर्डी, धांतोली मार्केटमध्ये पाणी शिरलं आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं.

नागपुरात १० हजार घरांचं नुकसान
फडणवीस म्हणाले, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. नागपूर शहरात झालेला पूर हा नेहमीपेक्षा अधिक पट जास्त होता. प्रत्येक प्रत्येक आपत्ती काहीतरी शिकवून जाते, त्यामुळे आता तशी व्यवस्था केली जाईल. नागपूर शहरात १० हजार घरांचं नुकसान झालं आहे. त्यांना योग्य ती मदत केली जाईल. काल झालेला पाऊस अधिक प्रमाणात होता त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.