चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
जाहीर झाल्यापासूनच चर्चेत असलेली चाळीसगाव शेतकी संघाची निवडणुक नाट्यमय घडामोडीनंतर बुधवारी माघारीच्या दिवशी बिनविरोध झाली. १०२ पैकी तब्बल ८७ इच्छुकांनी माघार घेतल्याने १५ संचालकांची बिनविरोध निवड झाली. आ. मंगेश चव्हाण यांनी धक्कातंत्र वापरत भाजपच्या पाच संचालकांचा संघात प्रवेश घडविला. तर काँग्रेसलाही संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीने बिनविरोध निवडीतही बहुमत राखले आहे. त्यामुळे आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शेतकरी संघाचे २३ वर्षापूर्वी पुनुरुज्जीवन झाल्यानंतर यावेळी प्रथमच भाजपने आव्हान देण्याची भूमिका घेतली. यामुळे निवडणुकीचा सामना रंगतदार होणार, असे एकुणच चित्र होते. १५ जागांसाठी १०२ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने बिनविरोध निवडीची आशा मावळली होती. तथापि, पडद्यामागे राजकीय घडामोडी घडल्याने माघारीच्या अखेरच्या दिवशी सामना बिनविरोध झाला.
बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ
सर्वसाधारण गट – शशिकांत साळुंखे, नानासाहेब पाटील, किशोर देशमुख, भास्करराव चव्हाण, रमेश राठोड, भास्कर पाटील (सर्व राष्ट्रवादी), प्रशांत देशमुख, अविनाश चौधरी, किशोर पाटील, विजय जाधव (भाजप), महिला प्रवर्ग – मेघा प्रशांत पाटील (भाजप), रेखा प्रकाश पाटील (राष्ट्रवादी),
अनुसूचित जाती – जमाती – एड. ईश्वर जाधव (काँग्रेस), भटक्या – विमुक्त जमाती – आनंदसिंह पवार (राष्ट्रवादी), इतर मागास प्रर्वग- सुन्धवा पवार (राष्ट्रवादी)