जळगाव-लोकशाही न्युज नेटवर्क –
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असतांना हा अपघात झाला. चोपडा येथून सभा आटोपून ते भुसावळ जात होते.
वाहनासमोर गतिरोधक आल्याने चालकाने वाहनाची गती कमी केली. परंतु मागून येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज न आल्याने ताफ्यातील शेवटी येत असलेल्या वाहनाने समोरील वाहनास धडक दिली,सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे