नरेंद्र मोदींनी ‘हा’ जावईशोध कुठून लावला !

शरद पवारांचा जोरदार टोला

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर पाच वर्षांमध्ये पाच पंतप्रधान असे धोरण आघाडीचे आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील प्रचारसभेत केला होता. मोदींच्या याच विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे. इंडिया आघाडीत अजूनही पंतप्रधान पदाबाबत कसलीही चर्चा झालेली नसताना मोदींनी पाच वर्षात पाच पंतप्रधान हा जावई शोध कुठून लावला? असा चिमटा पवारांनी काढला.

सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने इंडिया आघाडीने एक धोरण तयार केले आहे. दरवर्षी नवा पंतप्रधान देऊन पाच वर्षात पाच पंतप्रधान, अशी सत्तेची वाटणी त्यांनी केली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यावरुन मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता याचा विधानावर शरद पवारांनी टोला लगावला. तसेच पंतप्रधान पदाबाबत आज चिंता करण्याची गरज नाही. पुरेसे संख्याबळ असल्यानंतरच योग्य त्या नेत्याची या पदासाठी निवड केली जाईल, असेही पवार म्हणाले.

निवडणूक आयोगावर निशाणा 

तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्याची निवडणूक एका टप्प्यात होते. एका टप्प्यात येथे मतदान झाले. मग महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याचे कारण काय? याचा अर्थच असा की सत्ताधाऱ्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे मोदी वारंवार राज्यात कसे येतील याची काळजी घेण्यात आली आहे, अशा शब्दात शरद पवारांनी आयोगावरही निशाणा साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.