श्री रामजन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात असेल तब्बल १०८ फुटाची अगरबत्ती…

0

 

वडोदरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तुम्ही 108 फूट लांब अगरबत्ती पाहिली आहे का? 22 जानेवारीला अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण देश उत्सुक आहे. त्यानिमित्ताने गुजरातमधील वडोदरा येथे तब्बल १०८ फुट लांबीच्या अगरबत्तीची निर्मिती केली जात आहे. ती तयार झाल्यानंतर अयोध्येला पाठवण्यात येणार आहे.

या अगरबत्तीमध्ये शेण, गाईचे तूप, झाडाचे लाकूड, तीळ, जव, हवन साहित्यासह अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. ते बनवण्यासाठी बराच खर्च झाला असून, त्याची अंदाजे किंमत लाखोंच्या घरात आहे. अयोध्येला पाठवण्यासाठी लाखो रुपये खर्च होण्याचीही शक्यता आहे.

22 जानेवारीला अयोध्येत रामललाच्या मंदिराचा अभिषेक करण्याचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींना मोठ्या प्रमाणावर पाचारण करण्यात आले आहे. सुमारे चार हजार संतांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. सर्व परंपरेतील संत यावेत, असा प्रयत्न आहे. सर्व शंकराचार्य महामंडलेश्वर आणि शीख आणि बौद्ध पंथातील सर्वोच्च संतांना पाचारण करण्यात आले आहे. स्वामी नारायण, आर्ट ऑफ लिव्हिंग, गायत्री परिवार, शेतकरी, कलाविश्वातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. 1992 ते 1984 या काळात कार्यरत असलेल्या पत्रकारांनाही बोलावण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.