निमगावात ट्रॅक्टरखाली आल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील निमगाव येथे यावल भुसावळ मार्गावरील शेताजवळ रस्त्यावर भरधाव वेगाने ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आनंद रघुनाथ सोनवणे (१२) रा. निमगाव ता. यावल. आज दि. २० डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यावल हुन भुसावळ मार्गे मुक्ताईनगर येथे ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरने (एमएच १९डीएफ २५३५) यावल कडून भुसावळ मार्गाने जात असतांना निमगाव येथे शेताजवळील रस्त्यावर भरधाव वेगाने जात असतांना ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. याबाबत मयताचे काका किरण फकीरा कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने ट्रॅक्टर चालक सोनु छोटू पारधे रा. डोडीकर ता. चाळीसगाव याच्याविरुद्ध अपघातास कारणीभूत म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी  पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी उमेश सानप हे करीत आहे. दरम्यान मयत मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात डॉ प्रशांत जावळे यांनी केले. आकस्मित घडलेल्या घटनेमुळे मयताच्या नातेवाईकांसह गावावरती शेककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.