पाच गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई…

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा तालुक्यातील चार जण व एरंडोल तालुक्यातील एक युवक अशा एकूण पाच जणांवर हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती येथील प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी दिली कारवाई करण्यात आलेल्या आरोपींवर खंडणी मागणी, चोरी जबरी चोरी अशा विविध स्वरूपाचे पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

राहुल उर्फ राजू देविदास सरदार (42) रा. तामसवाडी ता.पारोळा ह.मु. राजीव गांधी नगर पारोळा या आरोपीवर आरटीआय कार्यकर्ता असल्याचे सांगून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच इतर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या आरोपीला जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

पलटी उर्फ विजय प्रताप चौधरी (33) रा.हत्ती गल्ली पारोळा हा आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हत्यारांसह पोलिसांना मिळून आला. या गुन्ह्यासह इतर तीन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, त्याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. हेमंत उर्फ नाऱ्या मच्छिंद्र पवार (20) रा. तामसवाडी ता. पारोळा या आरोपीवर चोरी तसेच एकाला कोयत्याने मारून जखमी केल्याच्या गुण्यासह एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वंश उर्फ गणेश काशिनाथ नरवाडे (२०) रा. रामदेव बाबा नगर तालुका पारोळा याच्यावर जबरी चोरी सह एकूण चार गुन्ह्यांची पोलीस स्टेशनला नोंद केलेली आहे. या आरोपीलाही एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. एरंडोल येथील केवढी पुरा भागातील रहिवासी सुकलाल उर्फ सुक्या हरि बागुल (22) या आरोपीवर चोरीसह इतर मिळून तीन गंभीर दाखल करण्यात आले आहे, याला जळगाव धुळे नंदुरबार या तीनही जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.