अकोला ;- अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी पातूर शहराजवळ (अकोला ) घडली. या अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना अकोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहे.
अपघातामध्ये किरण सरनाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (वय २८) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शिवाजी आमले (वय ३०), सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय ३५) आणि एका नऊ महिन्यांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. त्यात पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे. जखमींना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.