बड्या नेत्याचा दावा,’गडकरींची जागा धोक्यात- काँग्रेस

0

लोकशाही न्यूज नेटवर्क –

१ जून पर्यंत देशात निवडणुकीचे एकूण सात टप्पे पार पडतील आणि ४ जून या दिवशी निकाल लागणार आहे. या निकालात आम्ही ४०० जागा पार करु असा विश्वास एनडीए आणि भाजपाने व्यक्त केला आहे. तर महाविकास आघाडीनेही महाराष्ट्रात महाविकास आघाडी 38 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा केला आहे.
दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ चेन्नीथला, अमित देशमुख यांच्या उपस्थितीत अहमदपूर येथे जाहीर सभा घेतली यावेळी सभेत बोलतांना वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी 38 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त त्यांनी सांगितले, विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जागा धोक्यात आहे यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली.
मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये देशाचा मूड लक्षात आला आहे. लोकांमध्ये मोदी सरकार बाबत प्रचंड संताप आहे. याच कारणामुळे महाविकास आघाडी राज्यामध्ये 38 पेक्षा जास्त जागा जिंकेल. नितीन गडकरी यांची जागा सुद्धा धोक्यात आली आहे. विदर्भातील दहाही जागा या भाजपाच्या हातातून जातील असा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.