आमोदा येथे शॉर्टसर्किटने आगीत श्रीराम मंदिर आणि जेडीसीसी बँक शाखा जळून खाक

0

जळगाव ;- अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने श्रीराम मंदिरासह जेडीसीसी बँकेची शाखा देखील जळून खाक झाल्याची घटना यावल तालुक्यातील आमोदा गावी घडली असून सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नसून कुणीही जखमी झालेली नाही. जवळपास आठ अग्निशामक बंबांनी आग विझवली.

फैजपूरपासून ५ किलोमीटर लांब असलेल्या आमोदा या गावामध्ये प्रभू श्रीराम यांचे अनेक वर्षांपासूनचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामध्ये दररोज पूजा अर्चा होत असते. भाविक या ठिकाणी येऊन दर्शनासाठी गर्दी करीत असतात. गुरुवारी दि. २ मे रोजी रात्री दहा वाजेनंतर मंदिरात कुणी नव्हते. तेव्हा अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानंतर या ठिकाणी मोठी आग लागली आग लागली. आग इतकी पसरली की मंदिराच्या वर असणारी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

नागरिकांसह अग्निशामक दलाचे बंबांनी आग भिजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. फैजपूर, सावदा, रावेर, यावल, भुसावळ या ठिकाणच्या सुमारे आठ बंबांनी पहाटे दोन वाजेपर्यंत पूर्ण आग आटोक्यात आणून विझवली. या सर्व आगीमध्ये मंदिर आणि बँक दोघांचे अंदाजे २ लाखांच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. फैजपूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्याचे काम सुरू होते. आगीचे रुद्र रूप पाहतादेखील आमोदा ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेऊन मदत कार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.