आश्चर्यच.. जगातील सर्वात महाग काळे सफरचंद !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

वैज्ञानिक तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही गोष्टींमध्ये अविष्कार करून नवीन संशोधन केले जाते. काळ्या रंगाचे गाजर, बटाटे पाहून अनेकांना धक्का बसतो. पण तुम्ही काळ्या रंगाचे सफरचंद पाहिलेय का ? बसला न आश्चर्याचा धक्का.. हो हे खरं आहे.  आता काळ्या रंगाच्या सफरचंदांचेही उत्पादन घेतले जाते. त्यांना ‘ब्लॅक डायमंड अ‍ॅपल’ असे म्हटले जाते.

अतिशय दुर्मीळ

ब्लॅक डायमंड अ‍ॅपल अतिशय दुर्मीळ आहे. जगाच्या काही भागातच या ब्लॅक डायमंड अ‍ॅपलची शेती होऊ शकते. या सफरचंदाच्या वाढीसाठी विशेष हवामानाची आवश्यकता असते. ब्लॅक डायमंड सफरचंद तिबेटच्या टेकड्यांमध्ये विशेषतः न्यांगची या ठिकाणी पिकवले जाते. सफरचंदाच्या या जातीला ‘हुआ निऊ’ असेही म्हणतात.

ब्लॅक डायमंड सफरचंदचे फायदे 

या सफरचंदाची चव रसाळ असते. ब्लॅक डायमंड सफरचंद आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. त्यात उच्च विरघळणारे फायबर असते. जे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयरोग रोखण्यासाठी फायदेशीर आहे. ब्लॅक डायमंड सफरचंद खाल्ल्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते. ब्लॅक डायमंड सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए तसेच पोटॅशियम असते. ब्लॅक डायमंड अ‍ॅपलमध्ये अँटिऑक्सिडंटस् देखील भरपूर असते, ते शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. ब्लॅक डायमंड सफरचंद खाणं आरोग्याच्या द़ृष्टीने फायदेशीर असते.

सफरचंदची किंमत 

या सफरचंदाच्या खरेदीसाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागते. एका सफरचंदासाठी तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतात. त्याच्या किमतीत सतत बदलत राहतात. ब्लॅक डायमंड अ‍ॅपलचे पीक वाढवण्यासाठी अत्यंत काळजी आणि विशेष कौशल्ये आवश्यक असतात. याशिवाय उत्पादनाच्या बाबतीत हे सफरचंद इतर सफरचंदांच्या तुलनेत कमी वाढते. त्यामुळे ब्लॅक डायमंड सफरचंद खूप महाग आहे. काळ्या सफरचंदाच्या झाडाला फळ येण्यासाठी 8 वर्षे लागतात.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.