केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सिलिंडरचे भाव होणार कमी !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सिलिंडरच्या भावात वाढ झालेली पायहायला मिळाली आहे. अशातच केंद्र सरकार पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या किमती करणार आहे. पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारतात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्र सरकारने LPG ग्राहकांना मोठा दिलासा देऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सरकार गॅस सिलिंडरवर सबसिडी वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरच्या अनुदानात बाधा जाहीर करणे अपेक्षित आहे.

उज्ज्वला योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राहक संख्या वाढण्यावरही भर देत आहे. वाढत्या महागाईला आळा बसविण्यासाठी सरकारने महत्वाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. सप्टेंअबर महिन्यात महागाईचा दर ५.०२ टक्क्यांनी घसरला आहे. सरकारने आरबीआयला महागाई दर ४ ते ६ टक्क्यांदरम्यान ठेवण्याचे लक्ष दिले आहे. यापूर्वी जुलैमध्ये महागाईचा दर १५ महिन्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.