तेल अवीव ; – इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान आणखी एक घटना समोर येत आहे. पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. मात्र, हल्लेखोर आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार गोळीबार झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अबू जंदालच्या मुलाने राष्ट्राध्यक्ष अब्बास यांना इस्रायलविरुद्ध युद्ध घोषित करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता आणि तसे न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली होती. काल, ही मुदत संपल्यानंतर, अब्बास यांच्या ताफ्यावर हल्ला झाला ज्यामध्ये पॅलेस्टाईनचे अध्यक्ष थोडक्यात बचावले.
भर रस्त्यात हल्लेखोर आणि संरक्षण दलातील जवानांमध्ये बराच वेळ ही चकमक सुरू होती. जवानांच्या तीव्र प्रतिकारानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी संरक्षण अस्थापनांमध्ये घुसून हा हल्ला करण्यात आला होता. ‘सन्स ऑफ अबू जंदल’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.