जिल्हा बँकेचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज केले माफ…

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी घोषणा जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत तीन लाख रुपये पीक कर्ज घेतले आहे, त्या शेतकऱ्यांचे व्याज माफ करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

गेल्या वर्षी १२०० कोटी रुपयांचे कर्ज १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले व त्यावरील व्याजाची रक्कम ७२ कोटी रुपये इतकी असल्याचेही त्यांनी सांगितलेआहे.

जिल्हा बँकानी ३ लाखापर्यंत वर्षी पीक कर्ज वाटप केले होते, त्यांच्या कडून व्याज वसूल करु नये असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. मात्र नंतरच्या काळात पुन्हा नवीन आदेश केंद्राने काढत पीक कर्ज हे व्याजासहित वसूल करण्याचे आदेश दिले होते. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेत या विषयी तोडगा काढण्याची विनंती केल्याचे त्यांनी म्हटले.

मागील थकबाकीदारांसाठी हा निर्णय लागू होणार नसल्याचे संजय पवार यांनी स्पष्ट केले. जे शेतकरी नियमित कर्ज भरतील त्यांना चालू वर्षात वाढीव कर्ज दिले जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.