प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई

0

भाविकांना केळी तर सहकाऱ्यांना होणार पेढे वाटप

जळगाव;- अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार चौक व तीन उद्यानांमध्ये प्रभु श्रीरामांचे प्रतिमांसह आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.

प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी विशेष सजावट लालबहाद्दुर शास्त्री टॉवर, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे करण्यात येत आहे. यासह भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, गौराई उद्यान याठिकाणी आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात येणार आहे. यातून जळगावकरांना दिवाळीची अनुभूती होईल.

लालबहाद्दूर शास्त्री टॉवरवर ८० फुटाची प्रभू श्रीरामांची प्रतिमा
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांची भव्य अशी ८० फुट उंचीची प्रतिमा जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या लालबहाद्दुर शास्त्री टॉवरवर साकारली आहे. ही प्रतिमा भारतातील सर्वात मोठी असेल. यानंतर स्वातंत्र्य चौकात ३० फुट तर आकाशवाणी चौकात ४० फुटांचे प्रतिमा उभी करण्यात आली आहे. या प्रतिमेतून प्रभू श्रीरामाचे विराट दर्शन होत आहे.

५१ मंदिरांमध्ये भाविकांना केळी प्रसाद वाटप
जैन इरिगेशनतर्फे शहरातील जवळपास ५१ मंदिरांमध्ये केळी वाटप केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठादिवशी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना केळी प्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी शिवराज्याभिषेक लोकोत्सव समिती महाबळ उपनगर यांचे सहकार्य असेल.

दर्शन प्रभू श्रीरामांच्या विचारांचे…
काव्यरत्नावली चौकामध्ये सण-उत्सव व महापुरूषांच्या जयंती दिनी विशेष सजावट केली जाते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्रीरामाची १६ फुट प्रतिमेचे आणि सोबत ५ फुटी चार दिवे हे आकर्षक असेल यासह रोषणाई असेल “दर्शन.. वत्सलतेचे, मातृ-पितृ भक्तीचे! दर्शन.. त्याग, सत्यवचन, संस्कृतीचे! आदर्श संस्कार मर्यादेचे, पुरूषोत्तमांच्या सहिष्णुतेचे!” या संकल्पनेवर आधारित विशेष सजावट करून प्रभू श्रीरामांचा आदर्श आपल्या जीवनात आचरणाचा संदेश दिला जाणार आहे. ही सजावट जैन इरिगेशनच्या कलाविभागातील सहकारी जगदीश चावला व सहकाऱ्यांनी साकारली आहे.

जैन इरिगेशनच्या १३ हजाराहून अधिक सहकाऱ्यांना पेढे वाटप…
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या १३ हजारहून अधिक सहकाऱ्यांना पेढे वाटप करण्यात येणार आहेत.

स्नेहाच्या शिदोरीत ड्रायफूट शिरा
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त कांताई सभागृह येथे वाटप होणाऱ्या ‘स्नेहाच्या शिदोरी’ सोबत ड्रायफूट शिरा दिला जाणार आहे.

अशोक जैन अयोध्येला रवाना
श्रीराम मंदीर परिसरात प्राणप्रतिष्ठा सोहळा हा सात अधिवासांमध्ये होत आहे. देशातील जवळपास १२५ परंपरांचे संत-महापुरूष व भारतातील सर्व शाखीय २५०० श्रेष्ठ पुरूषांची उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हेही निमंत्रीत आहेत. ते आज अयोध्याला रवाना झालेत. ते श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ५० लाख भाविकांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.