शेती उत्पादनातील उच्चतंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान

0

हायटेक शेतीचा नवा हुंकार

हायटेक शेतीचा नवा हुंकार कृषी महोत्सवात सर्वच पिकांचे प्रात्यक्षिक : तज्ञांकडून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन हेच महोत्सवाचे यश

जळगाव येथील जैन उद्योग समूह हा शेतीवर आधारित उद्योगासाठी जळगावात नावाजलेला आहे. शेती व शेतकऱ्यांच्या बांधिलकीसाठी जैन इरिगेशन कटीबद्ध असल्याचे संस्थापक कै. भवरलालजी जैन अभिमानाने सांगायचे आणि ती कटिबद्धता आजही त्यांचे चारही सुपुत्र टिकवून आहेत. एकूण ३३ कारखाने १४६ कार्यालय व डेपो ११०० वितरकांचे जाळे आणि बाराशे हुन अधिक सहकारी आणि वार्षिक ९ हजार कोटीहून अधिक उलाढाल असलेल्या जैन इरिगेशनचे अमेरिका, मेक्सिको, ब्राझील, चिली, इंग्लंड, स्विझर्लंड, स्पेन, टर्की व ऑस्ट्रेलिया येथे प्रकल्प असले तरी त्यांचे मुख्य कार्यालय जळगाव येथे आहे जे विशेष आहे. त्यासाठी भारतात शेतकऱ्यांसाठी विशेषतः महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब होय.

भारतातील शेतकऱ्यांची शेती निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. कधी जास्त पाऊस तर कधी कमी पाऊस. त्यातच पावसाचे दिवसेंदिवस प्रमाण कमी होत असल्याने पाणीटंचाई पाचवीला पुजलेली आहे. अवकाळी वादळ वारा वाऱ्याने पावसाच्या तडाख्याचा शेतीला नेहमीच फटका बसतो. विशेषतः पाणी टंचाईमुळे शेतीला पाणी उपलब्ध होत नसल्याने कोरडवाहू पिके घ्यावी लागतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जमिनीतील पाणी देण्याऐवजी पिकाच्या मुळाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनची निर्मिती करणाऱ्या जैन उद्योग समूहाने ठिबक सिंचन निर्मितीत पहिला क्रमांक पटकाविला आहे. त्यानंतर शेती उत्पादनात विविध उच्च तंत्रज्ञानाच्या निर्मितीत समूह देशात अग्रेसर आहे. या समूहाच्या वतीने यंदा हायटेक शेतीचा नवा हुंकार कृषी महोत्सवाचे महिनाभर आयोजन करून महाराष्ट्र सह देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्याच्या उपक्रमाचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

35 वर्षांपूर्वी कै. भवरलालजी जैन यांनी शेतीसाठी लागणाऱ्या ठिबक सिंचन तंत्राच्या उत्पादनाला सुरुवात करून शेतीमध्ये त्यांचा वापर कसा करावा याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देऊन शेतकऱ्यांमध्ये ही संकल्पनाच्या अविरत प्रयत्नाने शेतीतील संशोधनाने उच्चतंत्र उपलब्ध केले. जैन उद्योग समूहाच्या शिरसोली रोडवरील १५०० एकर जमिनीपैकी १३०० एकर जमीन ठिबक सिंचन संयंत्र वापरून विविध प्रकारचे प्लांट तयार केले. त्यात पपई, लिंबू, मोसंबी, संत्रे, आंबे, सिताफळ, पेरू, कापूस, केळी, ऊस आदी पिकांचे प्लॉट तयार करून ते शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखविले. त्यानंतर या सर्व पिकांचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी आणि कमी कालावधीत उत्पादन घेण्यासाठी टिशू कल्चर रोपांची लागवड केली, तर त्याचा उत्पादनावर उत्पादन वाढीवर परिणाम होतो हे सिद्ध झाले. म्हणून सर्वच पिकांचे टिशू कल्चरल रोप निर्मिती करून ती शेतकऱ्यांना दिली.

त्यातून भरगोस उत्पादन येते हे पटल्यानंतर जळगाव लगत गिरणेकाठी असलेल्या टाकरखेडा येथे आजमितीला अडीचशे एकरात विविध पिकांची टिशू कल्चरल रोपे जमिनीत नव्हे तर पॉलिहाऊस मध्ये निर्माण करणारी टिशू कल्चरल प्लांट फॅक्टरी उभी राहिली आहे. ते विभागातील अनेक शेतकरी व उद्योजक ही प्लांट फॅक्टरी पाहण्यासाठी येऊन त्यांचे ज्ञान घेऊन जातात. सर्व प्रकारच्या जातींचे सुमारे १२ ते १५ कोटी टिशू कल्चर रोपे प्रतिवर्षाला या फॅक्टरीतून शेतकऱ्यांना विकली जातात. शासनाच्या सहकार्याने गिरणा नदीवर कांताई बंधारा उभारून त्यातील पाण्याचा टिशू कल्चर रोपांना देण्यासाठी आधुनिक पद्धतीने वापर केला जातो. त्यामुळे अलीकडे अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून टिशू कल्चर रूपांना वाढती मागणी आहे.

शेती उत्पादन वाढीसाठी टिशू कल्चर रूपांबरोबरच शेतीसाठी लागणाऱ्या आधुनिक अवजारांच्या निर्मितीमध्ये सुद्धा जैन उद्योग समूह देशात आघाडीवर आहे. शेतीच्या सिंचनासाठी लागणाऱ्या पीव्हीसी पाईप उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर जैन उद्योग समूह आहे. त्याचबरोबर शेती करण्यासाठी आणि शेतीत विविध पिकांच्या पेरणीसाठी पिकाच्या उत्पादनानंतर त्याच्या मळणीसाठी विविध प्रकारची उच्च तंत्रज्ञान अवजारे बनवले आहेत. विद्राव्य खते स्प्रिंकलर आणि सौर ऊर्जेची यंत्र सुद्धा जैन उद्योग समूह बनवते. हायटेक शेतीचा नवा हुंकार या जैन हिल येथे चार एकरातील आयोजित कृषी महोत्सव प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सह पाहण्याचा लाभ गेले महिनाभर हजारो शेतकरी घेत आहेत.

अत्यंत नियोजनबद्ध रीतीने आयोजित या कृषी महोत्सवाला सकाळी साडेचार वाजता शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीला प्रारंभ होऊन एका तासानंतर सर्व नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक नाष्टा भव्य असे मंडपात दिला जातो. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत तब्बल चार तास कृषी महोत्सवातील विविध पिकांच्या फॅक्टरीला प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकरी दुपारच्या जेवणासाठी मंडपात येतात आणि त्यानंतर टिशू कल्चर फॅक्टरीला पाहण्यासाठी शेतकरी कंपनीच्या बस द्वारे जातात. असा त्याचा क्रम असून दररोज हजारो शेतकरी या कृषी महोत्सवाचा लाभ घेऊन जात आहेत.

देशातील महोत्सव असल्याचा आनंद

गेले महिनाभर चाललेले भव्य दिव्य कृषी महोत्सव पाहून आपण भारतात नव्हे तर इजराइल सारख्या देशात असल्याचा आनंद शेतकऱ्यांना होतोय, अशी प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्यातील येवला येथील जैन उद्योग समूहाचे वितरक ज्ञानेश्वर आंधळे यांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातून हजारो शेतकऱ्यांनी हायटेक शेतीचा नवा होऊन कार्य कृषी महोत्सवाचा लाभ घेतल्याचे आंधळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.