महाराष्ट्रासह देशात पुढील 3 दिवस थंडीची लाट !

0

 

नवी दिल्ली ;- मध्य आणि पूर्व भारतात पुढील 48 तासात तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घट होणार असल्याचं आयएमडीने म्हटले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. पहाटेच्या वेळेस दाट धुके आणि गारठ्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे.

राजस्थान, दिल्लीमध्ये थंडीची स्थिती कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने (IMD) म्हटलं आहे. 16 जानेवारीपर्यंत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशातील हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.आज उत्तरेकडील राज्य पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान या भागात दाट धुके पसरण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. गेल्या 24 तासात जम्मू-काश्मीर लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद या भागात बर्फवृष्टी पाहायला मिळाली. दरम्यान पुढील 48 तासात काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.