मोठी बातमी; अखेर शरद मोहोळचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपीसह आणखी ६ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली आहे.

रामदास उर्फ वाघ्या मारणे असं मुख्य आरोपीचे नाव असल्याची माहिती आहे. त्यासोबतच विठ्ठल शेलार, यासह १० जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली आहे. शेलार आणि मारणे यांचा शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री लपलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पनवेल पोलीसांची मदत घेण्यात आली. या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मोहोळचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.