पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
पारोळा तालुक्यातील मुंदाणे-घांगुर्ले येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र महिला राज्य अध्यक्षा कल्याणी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवती आघाडी शाखा स्थापन करण्यात आली. गावातील युवतींना संबोधन करण्यासाठी पारोळा तालुका युवती आघाडी अध्यक्षा कुसुम बाविस्कर यांच्या हस्ते युवती शाखा प्रमुख म्हणून कु.गितांजली अरूण पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व युवतींना संघटनेच्या संकल्पांची माहिती देऊन संकल्प करण्यात आला की, महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी संघटीत होत आहेत परंतु आता आम्ही शेतकऱ्यांच्या लेकी ही संघटीत होण्याची गरज होती आणि आम्ही संघटीत झालो आहोत, ज्या पद्धतीने सर्व युवक-युवती शेतावर आपल्या आई बापाला मदत करतात अगदी त्याच पध्दतीने आता शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे कामी आम्ही मदत करणार आहोत व कुटुंबाचा सर्वांगीण विकास करू असा संकल्प केला.
यावेळी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या युवती आघाडी अध्यक्ष कुसुम बाविस्कर, संघटनेच्या पीआरओ आशा पाटील, रक्षा बिहार्डे, भाग्यश्री पाटील, निकिता पाटील, साक्षी कुलकर्णी, मोनिका पाटील, मोहिनी पाटील, मोहिनी सुनील पाटील, अश्विनी पाटील, खुशी पाटील हे उपस्थित होते. तर सदर कार्यक्रम हा गावातील विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला.