सोलापूर येथे डीपी जळाल्याने नागरिकांचे हाल, प्रशासनाची बघ्याची भूमिका

0

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळे तालुक्यातील हरळवाडी येथील डीपी जळाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकणारी करावी लागत आहे. गावात वीज नसल्याने दालन दळण्यासाठी बाहेर गावी जावे लागत आहे. मागील 26 दिवसांपासून गावकऱ्यांना पाणी आणि दळणासाठी भटकण्याची वेळ आली असताना प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याने आता नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील हरळवाडी हे गाव गेल्या २६ दिवसांपासून काळोख्यात आहे. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावासाठी एकाच कूपनलिकेस विद्युत पुरवठा होणार भगीरथ डीपी २६ दिवसांपूर्वी जळाला आहे. त्यामुळे अबाल वृद्धासह नागरिकांना पाण्यासाठी आणि दळण दळून आणण्यासाठी 3 ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

गावात अंधार असल्याने नागरिक कामधंदा, व्यापारी आपला व्यापार तर विद्यार्थी शाळा-कॉलेज सोडून पाणी आणि दळणासाठी भटकत आहे. याबाबत वारंवार कळवूनही गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला काडीमात्र फरक पडत नसल्याने नागरिकांनी आता आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.