‘टायगर ३’ मध्ये सलमान खान सोबत ‘हा’ अभिनेता दिसणार स्क्रिन शेअर करतांना

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या ‘टायगर३’ या चित्रपटामुळेचर्चेत आहे. सर्वच चाहते या चितपटाची आतुरतेने वाट बघत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सलमानसोबत किंग खान शाहरुखही पाहायला मिळणार आहे. शाहरुखच्या कॅमिओबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. ‘पठाण’मध्ये एकत्र मोठ्या पडद्यावर एकत्र झळकाल्यानंतर आता पुन्हा दोघ खान एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

‘टायगर ३’ या चित्रपटात सलमान खानसोबत शाहरुख खानचा खास १५ मिनिटांचा कॅमिओ असणार आहे. कॅमिओचे सिन हे साथ दुःस्वास मुंबईत शूट करण्यात आले आहे. हा एक स्टंट सिन असेल, शाहरुख आणि सलमानने पाकिस्तान तुरुंगातून पळून जाण्यासाठी शोले स्टाईल मोटरसायकलवर साईडकारसह दिसणार आहेत.

हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी टायगर ३ प्रदर्शित होणार आहे. त्याची कमालीची उत्सुकता चाहत्यांना आहे. टायगर 3 मधून सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी अनेक वर्षांनंतर थिएटरमध्ये परतत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.