पेंडगाव येथील शेतकऱ्याने घेतले वांग्याचे विक्रमी उत्पादन

0

लासगाव (ता.पाचोरा) ;- भडगाव तालुक्यातील पेंडगाव येथील शेतकरी अजाबराव पाटील यांनी आपल्या विस गुंठा. क्षेत्रावर वांग्याची लागवड केली आहे.सध्या वांग्याला बाजारात मोठी मागणी असल्याने प्रति कॅरेट एक हजार रुपये भाव मिळत आहे.

किरकोळ बाजारात वांग्याची प्रतीकिलो ६० रुपये दराने विक्री होत आहे. वांग्याची तोडणी एक दिवसाआड केली जाते.देखभाल तोंडणी साठी चांगली मेहनत घेतल्याने चांगल्या व दर्जेदार उत्पादन निघत असल्याचे पेंडगाव येथील शेतकरी अजाबराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.