गव्हाचे वाढले भाव, खिशाला बसणार कात्री

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या खुल्या बाजारात गव्हाची आवक मंदावली असून नवीन गहू उपलब्ध होण्यासाठीही जवळपास दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गव्हाचे भाव वधारले आहेत. म्हणून खुल्या बाजारात एक क्विंटल गव्हासाठी किमान चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे तुमच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

नवीन गव्हाची जवळपास दीड महिन्याचा कालावधी लागणार असून जुना गहू देखील विक्रीसाठी शिल्लक नसल्यामुळे आवक मंदावत आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी गव्हाची भाववाढ केली आहे. तसेच वर्षभरासाठी साठवून ठेवलेल्या गव्हाचा साठा संपल्याने बाजारात गव्हाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे गव्हाच्या किंमती चार ते पाच रुपयांनी वाढल्या आहेत.

जळगाव शहरातील व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाचे नवीन उत्पादन मार्च महिन्यात येईल, तोपर्यंत ही दरवाढ कायम राहील. त्यात आणखी एक ते दोन रुपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच किलोमागे पाच रुपये भाववाढ झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.