शाकंभरी पौर्णिमेनिमित्त केतकी पाटलांनी घेतले भवानी मातेचे दर्शन

0

मोरगांव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मौजे कुसुंबे येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी ग्रामदेवता भवानी मातेचा यात्रोत्सव असतो. हजारो भाविक या ठिकाणी दूरवरून दर्शनासाठी येत असतात. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या या भवानी मातेच्या मंदिराच्या पायथ्याखाली एक जिवंत झरा असून बारमाही या झऱ्यामधलं पाणी आटत नाही.  या ठिकाणी झऱ्यातील पाणी पिण्यासाठी भाविक भक्त गर्दी करीत असतात. तसेच शेजारील मध्यप्रदेश राज्यातून सुद्धा मातेचे भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.

नुकत्याच भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेल्या व गोदावरी फाउंडेशन जळगावच्या संचालिका केतकी पाटील यांनी सहकुटुंब दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी केतकी पाटलांसह कार्यकर्ते व महिला मंडळ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.