अखेर अंगणवाडी सेविकांचा संप मागे, प्रमुख मागण्या मान्य

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी दीड महिन्यापासून संपावर होते. अखेर शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना पेन्शन योजना  व ग्रॅच्युइटी लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, या निर्णयाची घोषणा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव  यांनी केल्यानंतर अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी संप मागे घेतला. मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मिनी अंगणवाड्याचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर, सेविकांना तत्काळ मोबाईल दिले जाणार असून, मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने  जाहीर केला.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांनुसार  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी देणार, मोबाईल हॅण्डसेट तत्काळ देणार, मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका, पदाचे आदेश त्वरित देणार, कोरोनाकाळात तसेच उन्हाळी व दिवाळी सुटीमध्ये केलेले काम संपकाळात समायोजित करावे, त्याद्वारे संपकाळातील मानधन अंगणवाडी सेविकांना मिळेल, यावर सकारात्मक विचार, दहावी उत्तीर्ण मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती देणार, दीड महिना अंगणवाडी सेविकांचे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.