प्रजासत्ताक दिनानिमित्त मेंढोदे जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

0

मुक्ताईंनगर ;- पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आदर्श उपक्रम पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने तालुक्यातील मेंढोदे येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे सर यांनी ऑनलाईन उपस्थिती दिली. मेढोदे येथील झालेल्या कार्यक्रमात मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष पर्यावरण नितीन जोगी सरपंच सोपान सपकाळे उपसरपंच सुलतान पठाण, पोलीस पाटील अलका चौरे ,मुख्याध्यापक महेंद्र गर्गे ,शिक्षिका, गावकरी व पर्यावरण प्रेमी देखील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.