आगग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी सरसावली मुस्लिम मनियार बिरादरी

0

जळगाव ;- कोल्हे वाड्यात राहणाऱ्या शितल मराठे यांच्या घराला आग लागून घरातील अन्नधान्य, कपडे ,साहित्य , घरातील सर्व वस्तू रोख रक्कम आदी सुद्धा जळून खाक झाल्याने जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख व उपाध्यक्ष सैयद चांद यांच्यासह मन्यारवाड्यातील कार्यकर्ते अब्दुल रऊफ टेलर, राजू खरादी,अख्तर शेख, वसीम शेख, मुजाहिद खान ,रफिक शेख, ताहेर शेख, जुल्कर नैन, हे स्वतः शीतल मराठे यांच्या घरी जाऊन त्यांची आई लक्ष्मीबाई व मुलगा हेमंत यांना भेटून त्यांनारोख मदतीचा हात देऊन दिलासा दिला.

२६जानेवारी २४ या ७५ वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ७५०० रुपयाची मदत शितल मराठे यांना करण्यात आले तसेच अजून जी काही मदत लागेल ते करण्याचे अभिवचन मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी शितलताई यांना दिले.

शितल मराठे यांच्याशी चर्चा करताना कळाले की अद्याप त्यांना शासनाची अथवा लोकप्रतिनिधीची, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यां तर्फे कोणत्याही स्वरूपाची मदत मिळालेली नाही म्हणून मन्यार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी जळगाव शहरातील दानशूर दाते यांना आवाहन केले आहे की त्यांनी शीतल मराठे यांना मदत देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.