अमळनेर येथे शेड नेट घोटाळाप्रकरणी शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून केले अनोखे आंदोलन

0

अमळनेर : – येथील तहसील कार्यालयासमोर चार शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी सकाळी शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी स्वतःला जमिनीत गाडून घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन करून अमळनेर वासियांचे लक्ष वेधून घेतले. या घोटाळ्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अनुदानित शेडनेट तसेच पॉलिहाऊसमध्ये अमळनेर व पारोळा तालुक्यात घोटाळा झाला असून हे साहित्य शेतकऱ्यांपर्यंत न पोहचविता परस्पर रक्कम बाळकावल्याचा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील, शिवसेनेचे अनंत निकम, कैलास पाटील, नारायण पाटील, ईश्वर पाटील आदींनी केला होता . तसेच याबाबत चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत कारवाई न झाल्यास स्वतःला गाडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज शुक्रवारी सचिन पाटील, अनंत निकम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी सकाळी स्वतःला मातीत गाडून घेतले .

मात्र तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी दोन आठवड्यात शेड नेट घोटाळ्याची चौकशी करून गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.