खुशखबर; दूध झाले स्वस्त…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

दुधाचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून वाढले होते मात्र आता, संक्रांतीला जळगांव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (विकास दूध) ग्राहकांसाठी गोड बातमी दिली आहे. विकास स्मार्ट, विकास शक्ती, विकास ताजा तसेच विकास लाईट यामध्ये लिटर मागे किमान २/- रूपये कपात करण्यात आली आहे. जळगांव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने ग्राहकांसाठी विकास दूध प्रती लिटर २/- रूपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.

नवीन वर्षात जिल्हा दूध संघाने ग्राहकांसाठी विकास दूधाच्या दरात प्रति लिटर २/- रूपये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर कपातीबाबत नुकताच संचालक मंडळाच्या वतीने निर्णय जाहिर करण्यात आला असून दि. ११ जानेवारी २०२४ पासून हे नवीन दर लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती जळगांव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन आ. मंगेश चव्हाण व कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.